लातूर शहर महानगर पालिका लातूर
प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल योजना)
अर्ज करण्याची पद्धत

अर्ज कसा भरावा :

1. सर्वप्रथम संकेत स्थळावरून मराठी अर्ज व नमुने डाऊनलोड करून घ्यावे.

2. डाऊनलोड केलेले अर्ज व नमुने व्यवस्तीत भरून घेतले आहे याची खात्री करून घ्यावी.

3. उत्पनाच्या दाखल्याचा नमुना डाऊनलोड करून व्यवस्तीत भरून स्वसाक्षांकित करणे आवश्यक आहे.

4. अर्जासोबत सादर करावयाचे प्रतिज्ञापत्र हे रु. १००(शंभर) च्या मुद्रांकावर असणे अपेक्षित आहे, रु. १०० चा मुद्रांक उपलब्ध नसल्यास कोऱ्याकागदावर सुद्धा चालेल व त्यासाठी लागणारा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे लाभ मिळतेवेळी रु. १०० च्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक राहील.

5. सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारल्या जातील त्याकरिता ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे आणि कागदपत्रे खालील अनुक्रमात असणे आवश्यक आहे.

कागदपत्राचा अनुक्रम
आवश्यक कागदपत्रे :
A) उत्पन्नाचा दाखला (स्वतः प्रमाणित केलेले)
B) अर्जासोबत सादर करावयाचे प्रतिज्ञापत्र. अर्ज करतेवेळी प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर द्यावे लागेल पण लाभ मिळतेवेळी रु.१०० च्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक राहील.
C) आधार कार्ड
D) अर्जदाराच्या नावाचे बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत (IFSC कोड असलेला)
E) संबंधीत माननीय नगरसेवकांच्या स्वाक्षरीचा रहिवासी दाखला.
गरज भासल्यास लागणारे कागदपत्रे :
F) BPL प्रमाणपत्र (BPL असल्यास)
G) जातीचा दाखला (SDO/तहसीलदार)
H) जात पडताळणीचे प्रमाणपत्र
I) PAN कार्ड
J) राशन कार्ड
K) विधवा असल्याचे पुरावे (विधवा असल्यास)
L) TAX पावती (केवळ झोपडपट्टीसाठी)
M) घटस्फोटित/पारितकत्या असल्याचे पुरावे (घटस्फोटित/पारितकत्या असल्यास)
N) अपंगत्वाचे प्रमाणपत्र (अपंग असल्यास)
O) भूखंडाचा खरेदी प्रत / भूखंडाचे PR Card किंवा ६/२ दाखला, इतर कागदपत्रे (घटक क्र. ४ करीत अनिवार्य)
P) सिटी सर्वेचे मिळकत प्रमाणपत्र (घटक क्र. ४ करीत अनिवार्य)
Q) इतर (विद्युत देयक, पाणीपुरवठा बिल, टेलीफोन बिल, इत्यादी)
R) अर्जदाराचा प्रस्तावित बांधकामाच्या जागेसह फोटो (घटक क्र. ४ करीत अनिवार्य)

अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर करताना सर्व घटक बाबत माहिती करून घ्यावी व त्यानुसार घटक निवडावा

घटक क्र. घटकाचा प्रकार (योजनेच्या उपबाबी) बांधकामाचे कमाल क्षेत्रफळ मिळणारे अंशदान योजने करिता पात्रता अर्जासोबत सादर करायचे कागदपत्रे
1 जमिनीचा साधन संपत्ती म्हणून वापर करून त्यावरील झोपडपट्ट्यांचा आहे तेथेच पुनर्विकास करणे.

(विकासक /कंत्राटदार यांच्या माध्यमातून पुनर्विकास करणे)

(घरकुल बांधकामासाठी शासकीय अंशदान व्यतिरिक्त उर्वरित रकमेची सोय इच्छुक कुटुंबाला स्वतः करावी लागेल.)
३० चौ. मी. चटई क्षेत्रपर्यत रु. २ लक्ष सन २००० च्यापूर्वी पासून शासन मालकीच्या जागेवरील झोपडपट्टी भागातील राहण्यास योग्य व आरक्षण अबाधित जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबा करिता A) उत्पन्नाचा दाखला (स्वतः प्रमाणित केलेले)
B) अर्जासोबत सादरकरावयाचे प्रतिज्ञापत्र .अर्ज करतेवेळी प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर द्यावे लागेल पण लाभ मिळतेवेळी रु. १०० च्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक राहील.
C) आधार कार्ड
D) अर्जदाराच्या नावाचे बँकेचे पासबुक ची झेरॉक्स प्रत (IFSC कोड असलेला)
E) संबंधीत माननीय नगरसेवकांच्या स्वाक्षरीचा रहिवासी दाखला.
F) टॅक्स पावती
G) दिनांक १ जानेवारी २००० अगोदर पासून घोषित झोपडपट्टीत राहण्याचा पुरावा
2 कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न उत्पन्न घटकासाठी परवडणाऱ्या घराची निर्मिती करणे. ६० चौ. मी. चटई क्षेत्रपर्यत ४ % सवलती दराने रु ९ लक्ष पर्यंतचे कर्ज किंवा ३ % सवलती दराने रु. १२ लक्ष पर्यंतचे कर्ज वार्षिक उत्पन्न ६ लक्ष पेक्षा कमी असलेल्या तसेच भाडेकरू /संयुक्त कुटुंबातील /बेघर /आरक्षण बाधित जागेवर /राहण्यास अयोग्य जागेवर राहणाऱ्या कुटुंब करिता. A) उत्पन्नाचा दाखला (स्वतः प्रमाणित केलेले)
B) अर्जासोबत सादरकरावयाचे प्रतिज्ञापत्र .अर्ज करतेवेळी प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर द्यावे लागेल पण लाभ मिळतेवेळी रु. १०० च्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक राहील.
C) आधार कार्ड
D) अर्जदाराच्या नावाचे बँकेचे पासबुक ची झेरॉक्स प्रत (IFSC कोड असलेला)
E) संबंधीत माननीय नगरसेवकांच्या स्वाक्षरीचा रहिवासी दाखला
F) पॅन कार्ड
G) स्वतःच्या जमिनीवर बांधकाम करायचे असल्यास जमीन मालकीचे पुरावे
3 खासगी किंवा शासकीय विकासकाकडून भागीदारी मध्ये परवडणाऱ्या घरांची (Flat System) निर्मिती करणे.

(घरकुल बांधकामासाठी शासकीय अंशदान व्यतिरिक्त उर्वरित रकमेची सोय इच्छुक कुटुंबाला स्वतः करावी लागेल.)
३० चौ. मी. चटई क्षेत्रपर्यत २. ५० लक्ष रुपये पर्यंत वार्षिक उत्पन्न ३ लक्ष पेक्षा कमी असलेल्या तसेच भाडेकरू /संयुक्त कुटुंबातील /बेघर /आरक्षण बाधित जागेवर /राहण्यास अयोग्य जागेवर राहणाऱ्या कुटुंब करिता. A) उत्पन्नाचा दाखला (स्वतः प्रमाणित केलेले)
B) अर्जासोबत सादरकरावयाचे प्रतिज्ञापत्र .अर्ज करतेवेळी प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर द्यावे लागेल पण लाभ मिळतेवेळी रु. १०० च्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक राहील.
C) आधार कार्ड
D) अर्जदाराच्या नावाचे बँकेचे पासबुक ची झेरॉक्स प्रत (IFSC कोड असलेला)
E) संबंधीत माननीय नगरसेवकांच्या स्वाक्षरीचा रहिवासी दाखला
F) भाडे पावती
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान.

(घरकुल बांधकामासाठी शासकीय अंशदान व्यतिरिक्त उर्वरित रकमेची सोय इच्छुक कुटुंबाला स्वतः करावी लागेल.)

(कुटुंबाच्या मालकीचा खुला भूखंड किंवा कुटुंबाच्या मालकीच्या भूखंडावर कच्च्या स्वरूपाचे घर किंवा कुटुंबाच्या मालकीच्या भूखंडावर सुधारणा होऊ शकेल असे घर असने आवश्यक)
३० चौ. मी . चटई क्षेत्रपर्यत २. ५० लक्ष रुपये पर्यंत वार्षिक उत्पन्न ३ लक्ष पेक्षा कमी असलेल्या तसेच भाडेकरू /संयुक्त कुटुंबातील /बेघर /आरक्षण बाधित जागेवर /राहण्यास अयोग्य जागेवर राहणाऱ्या कुटुंब करिता. A) उत्पन्नाचा दाखला (स्वतः प्रमाणित केलेले)
B) अर्जासोबत सादरकरावयाचे प्रतिज्ञापत्र .अर्ज करतेवेळी प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर द्यावे लागेल पण लाभ मिळतेवेळी रु. १०० च्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक राहील.
C) आधार कार्ड
D) अर्जदाराच्या नावाचे बँकेचे पासबुक ची झेरॉक्स प्रत (IFSC कोड असलेला)
E) संबंधीत माननीय नगरसेवकांच्या स्वाक्षरीचा रहिवासी दाखला
F) निवासी भूखंड (N/A Land) च्या मालकीचा पुरावा (६/२, PR card ,खरेदी प्रत,Tax पावती)
E)अर्जदाराचा प्रस्तावित बांधकामाच्या जागेसह फोटो.
(फोटो घेताना जागेची उजवी व डावी बाजू जागेच्या सीमेसह पूर्णतः दिसत आहे याची खात्री करून घ्यावी)